शेती ही सर्व प्रकारच्या मुलभूत मानवी गरजांची पूर्तता करता येण्यासाठीची
'जीवनपध्द्ती' आहे.
आजच्या वेगवान जीवनात, माणसाच्या जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या काळात ,जमीनीची
काळजी ज्या पध्दतीने घ्यायला हवी होती ती न घेतल्यामुळे शेतकरी संकटात
सापडलेला आहे.
शेतकर्यांच्या
सर्व प्रश्नांची उत्तरे
'जमीन - माती' यातच दडलेली आहेत. त्या सुधारण्याच्या साध्या
सोप्या पध्दती आम्ही प्रयोग करून विकसित केल्या आहेत , करत आहोत.
सेंद्रीय शेती करत असताना आम्ही सन 2002 पासून ,पुढील शेती व्यवस्थापन
पध्दतीवर अभ्यास प्रयोग करत आहोत -
- जमीन तयार करण्याच्या पध्दती
- नियमित माती निर्मिती प्रकार
- पाणी (मोजका वापर )
- पीक
- बीज संस्कार
- टोकणी, पेरणी, वाढीच्या अवस्था
- मिश्रपीक पध्दती, आंतरपीक पध्दती / फेरपालटची पीक पध्दती
- खत निर्मिती, हिरवळीचे खत प्रकार
- सेंद्रीय शेतीमाल
: स्वयं विक्री पध्दती
- शेती अर्थशास्त्र
: शेतीचा हिशोब ठेवण्याच्या सोप्या पध्दती
आम्ही स्वामी परिवारातील सर्व क्षेत्रातील मंडळी एकत्र येऊन शेतकर्यांच्या
आजच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी, साध्या सोप्या पद्धती विकसित करण्याचा व
त्याचा वैज्ञानिक पाया सर्व शेतकर्यांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न
करत आहोत. याचाच एक भाग म्हणून ही वेबसाइट आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत. या
वेबसाइटच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने शेती करणार्या शेतकर्यांसाठी
एक मंच उभारण्याचा पण आम्ही प्रयत्न करत आहोत.